PM किसान योजना १६ हफ्ता तारीख जाहीर झाली, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला का?

PM किसान योजना १६ हफ्ता तारीख जाहीर झाली, योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला का?

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी PM किसान योजना  16 व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. PM किसान योजना  16 हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करणार आहेत.

PM किसान योजना

PM किसान योजना : उद्दीष्ट

PM किसान योजना हे एक केंद्र सरकारचे प्रस्ताव आहे ज्यानुसार भारतातील शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य मिळवून त्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करण्यात येईल. ही योजना सरकारच्या “प्रधानमंत्री कृषि सम्मान योजना” या अंतर्गत प्रारंभ केली  आहे. त्यामध्ये योजनेच्या अंतर्गत सर्व राज्यांतील शेतकर्‍यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवायला तयार आहे.

योजनेच्या प्रमुख विशेषतांपैकी एक म्हणजे सरकारने शेतकरी तथा त्याच्या कुटुंबियांना वार्षिक रु. 6,000 चा निर्धारित रक्कम देण्यात आलेली आहे. हे रक्कम तीन मुख्य भुमिमापक परिषदांवर विभागाने तपासून घेतली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो.

  • देशभरातील सर्व लहान आणि अल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना मूलभूत आर्थिक सहाय्य प्रदान करणे, परंतु यासाठी अट अशी आहे की ती शेतीयोग्य जमीन असावी.
  • उत्तम कृषी पीक, जास्तीत जास्त पीक उत्पादन आणि कृषी संबंधित उपक्रमांशी उत्पादनांची खरेदी सुनिश्चित करण्यासाठी विविध कृषी गुंतवणूकींच्या खरेदीमध्ये अल्प उत्पन्न शेतकर्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे साठी हातभार लागावा.
  • देशातील ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेस चालना देणे.
  • 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी भारत सरकारने केलेले प्रयत्न पार पाडणे.

साधारण २०१९ ते २०२२ साठी सुरु केलेली पीयम किसान योजना ही २०२४ मध्ये देखील सुरु आहे,

PM किसान योजना : उद्दीष्ट

PM किसान योजना:PM किसान सन्मान निधीयोजनासाठी अर्ज कसा करावा.

पीएम किसान  योजना ही केंद्र सरकार तर्फे वार्षिक ६००० रुपये शेतकर्यांना देणारी आहे. म्हणजेच दर ४ महिन्यांनी २०००/- रुपये असे वार्षिक तीन वेळा, या पद्धतीने दिले जातात.

  •  प्रथम PMKSNY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.https://pmkisan.gov.in/
  • फार्मर्स कॉर्नर विभागात “नवीन शेतकरी नोंदणी” वर क्लिक करावे.
  • त्या नंतर रूरल फार्मर रेजिस्ट्रेशन वर क्लिक करून आधार नो. , मोबाइल नो, स्टेट सिलेक्ट करावा , दिलेला capta टाकून गेट otp वर क्लिक करावे.
  • OTP टाकून  झाल्यावर तुम्हाला आवश्यक्य माहिती टाकून आपले रेजिस्ट्रेशन कंप्लेंट करायचे आहे.
  • जे शेतकरी स्वयं-नोंदणी करतात आणि CSC द्वारे नोंदणी करतात ते शेतकरी कॉर्नर अंतर्गत “स्वयं-नोंदणीकृत/CSC शेतकऱ्यांची स्थिती” पर्यायावर क्लिक करून त्यांची PM किसान सन्मान निधी योजना स्थिती तपासू शकतात.

PM किसान योजना e kyc  करण्यासाठी पुढील स्टेप्स अनुसार करा.

  • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • सर्च पर्यायावर क्लिक करा.
  • आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.

PM किसान योजना लाभार्थी पात्रता स्टेटस ऑनलाईन कसे तपासावे?

ज्या शेतकर्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असतील त्यांनी ऑनलाईन त्यांच्या पात्र – अपात्रते विषयी सद्यस्थिती तपासून घ्यावी.  https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

  • पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • मुख्यपृष्ठावरील KNOW your Status पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा Registration  नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • GET OTP  क्लिक करा.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.
  • त्यामध्ये ELIGIBILITY STATUS ऑप्शन ला Land Seeding / e-Kyc Status / Aadhar Bank Account Seeding Status – ✅ असे ग्रीन टिक मार्क दिसले पाहिजे तरच शेतकर्यांना या योजनेचा हप्ता जमा होईल.
  • आपले स्टेटस दिसेल त्यामध्ये (Reason for Rejection) हा महत्वाचा पर्याय पाहा. जर येथे काही कारण दिसत असेल तर त्यानुसार आपण तालुका कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट देवून, ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून घ्याव्यात. तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

पीएम किसान योजना,  तुमचे नाव तपासा

आपण जरपीएम किसान योजना  या  योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आपण पात्र असाल तर आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का? हे आपण ऑनलाइन वेबसाईट वर देखील पाहू शकता.https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

  • मुख्यपृष्ठावरील BENIFICIARY LIST पर्यायावर क्लिक करा
  • प्रमाणे जिल्हा तालुका ब्लॉक गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट वर क्लिक करा.
  • पुढे तुम्हाला यादी दिसेल त्यामध्ये तुमचे नाव तपासू शकता.
  • नावामध्ये काही चूक असल्यास तुम्ही ते पण ऑनलाइन वेबसाईट वर करू शकता .
  • मुख्यपृष्ठावरील NAME CORRECTION AS PER AADHAAR पर्यायावर क्लिक करा.
  • मचा Registration  नंबर आणि कॅप्चा कोड टाका.
  • GET OTP  क्लिक करा.
  • मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
  • सबमिट पर्यायावर क्लिक करा.

अजूनही आपण पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी नसाल, आणि या योजनेचा लाभ घेवू इच्छित असाल, तर वर दिलेल्या माहिती चा वापर करून अर्ज आणि आवशक्य कागदपत्रे पूर्तता करून लाभ घ्यावा.

ऑनलाइन अर्ज टिप्स आणि मार्गदर्शन तुम्हाला आवडल्या असेल तर अश्याच नविन नविन टिप्स साठी माझ्या पेज ला follow करा .  https://darshkarkareblog.com/

 

 

Scroll to Top