माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?

माझी लाडकी बहीण योजना

महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषणा केली.

माझी लाडकी बहीणयोजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार सर्व स्तरातील महिलांना मिळणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना पात्रतेचे निकष

माझी लाडकी बहीण योजना  लाभ अधिकाधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत.

जुलैपासून माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज सुरू झाले आहेत.सुरुवातीला यामध्ये 21 ते 60 वर्षापर्यंतची अट घालण्यात आली होती. आता यामध्ये 5 वर्षांनी मुदत वाढवण्यात आली आहे.योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै, 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती.आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे.

1) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
3) कमीत कमी 21 वर्ष ते जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत अर्ज करता येणार.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
5) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण अपात्र?

माझी लाडकी बहीण योजना साठी काही अपात्रताही निश्चित करण्यात आल्या आहेत. माझी लाडकी बहीण योजना साठी अपात्रतेचे आठ निकष निश्चित करण्यात आले आहेत.

1) ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

2) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
3) ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले अथवा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.4) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये जास्त लाभ घेतला असेल.5) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे.6) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत.

7) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.

8) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.

माझी लाडकी बहीण योजना  लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज

2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड

3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.

4) सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. / शिधा पत्रिका (रेशन कार्ड)

5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.

6) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

 

माझी लाडकी बहीण योजनेसाठी रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर 15 वर्षापूर्वीची ही कागदपत्रे द्यावी लागणार.

माझी लाडकी बहीण योजना साठी  रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?

माझी लाडकी बहीण योजना साठी पात्रतेच्या निकषांमध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर इतर पर्याय देण्यात आले आहेत.

1) रेशन कार्ड
2) मतदार ओळखपत्र
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
4) जन्म दाखला

-माझी लाडकी बहीण योजनेसाठी या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी इतर राज्यातील महिलांही करू शकता अर्ज

माझी लाडकी बहीण योजना  लाभ  परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला नसेल, तर काय कराल?

माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी अर्ज  अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट आहे. मात्र, उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, तर ज्यांच्या पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात आली आहे. ते रेशन कार्ड जोडून अर्ज भरतात. योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी कसा कराल अर्ज?

माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज पोर्टल, मोबाईल , सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.

पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.

भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन ॲप वापरा.माझी लाडकी बहीण योजना

आपल्याला माझी लाडकी बहीण योजना  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doothttps नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड किंवा या लिंक वरून डाउनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे. ते केलं की पुढे या Application विषयी माहिती दिलेली दिसेल.

माझी लाडकी बहीण योजना

त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याखालच्या terms and conditions accept करायच्या आहेत (Tick करायचा आहे) . मग लॉग-इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकायचा आहे . त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करायचं आहे. मग तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे.माझी लाडकी बहीण योजना

 

यात अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी टाकायचा आहे. पुढे जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक) निवडायचा आहे. मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग नवीन पेज ओपन होईल. इथं स्क्रीनवर दिसणाऱ्या नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर योजनेचा अर्ज ओपन होईल.

narishakti dootसुरुवातीला अर्जदार महिलेची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात सुरुवातीला अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक टाकायचं आहे. पुढे अर्जदाराचा पत्ता, यात जन्माचं ठिकाण- जिल्हा, तालुका, गाव किंवा शहर, ग्रामपंचायत किंवा महापालिकेचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. मग पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आधार क्रमांक टाकायचा आहे.

शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे. पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.

यानंतर खाली दिलेली सर्व कागदपत्रं अपलोड करायची आहेत.

 

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र – 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक.
  • उत्पन्न प्रमाणपत्र – अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड.
  • अर्जदाराचे हमीपत्र – अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील Accept हमीपत्र इथं दिलेला आहे. एका कागदावर तुम्ही ते लिहून त्यावर सही व दिनांक टाकून इथं डाऊनलोड करू करू शकता.
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो – कॅमेरा सुरू होईल आणि मग फोटो काढायचा आहे.नंतर आपण, Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल.सूचना – ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो.
    माझी लाडकी बहीण या योजनेचाअर्ज केल्यानंतर पुढे काय? 
  • माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की, “जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येईल. पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”आपल्याला अर्ज  करताना कदाचित Error येऊ शकतो. तरी काळजी करू नये. जास्त Request असल्याने आपल्याला अशी एरर येऊ शकते. तेव्हा आपण काही वेळाने किंवा रात्री उशिरा प्रयत्न करावा कारण त्यावेळेस कमी यूजर्स असतात.
    ऑनलाइन अर्ज टिप्स आणि मार्गदर्शन तुम्हाला आवडल्या असेल तर अश्याच नविन नविन टिप्स साठी माझ्या पेज ला follow करा .  https://darshkarkareblog.com/

 

Scroll to Top